नगर जिल्ह्यात दहा नवीन रुग्ण तर एकोणीस जण कोरोनमुक्त






अहमदनगर- (प्रतिनिधी) आज जिल्ह्यातील १९ व्यक्तीना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १८६ झाली असून आणखी नवीन ० रुग्णांची भर काल रात्री ९:३० पर्यंत पडली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पाचही बाधित संगमनेर तालुक्यातील आहेत. या पाचपैकी ३ जण निमोण येथील एकाच कुटुंबातील असून यात १४ वर्षीय मुलगी, १८ वर्षीय मुलगा आणि ३६ वर्षीय महिलेचा समावेश. संगमनेर शहरातील दाते मळा येथील ३८ वर्षीय महिला आणि मोगलपुरा येथील ४८ वर्षीय महिलाही बाधित झाले आहेत. खाजगी प्रयोगशाळेत दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात एक ६५ वर्षीय पुरुष तर ३२ वर्षीय महिलेचा समावेश आहे तसेच तिघे जण संगमनेर शहरातील आहेत. या तीन बाधितामध्ये संगमनेर येथील ७३ वर्षीय व्यक्ती. ही व्यक्ती नाशिकहून प्रवास करून आली होती. याशिवाय, नगर शहरातील सारसनगर येथील ५८ वर्षीय व्यक्तीला लागण. यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील ही व्यक्ती. तसेच गजानन कॉलनी एमआयडीसी येथील काल बाधित आलेल्या व्यक्तीची पत्नीही आज कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली.

 

जिल्हयातील अॅक्टिव केसेस ४९

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २४६

 

(महानगरपालिका क्षेत्र ५४, अहमदनगर जिल्हा १३१, इतर राज्य ०३, इतर देश ०८ इतर जिल्हा ५०)

 

एकूण स्त्राव तपासणी  ३२६६

 

निगेटीव  २९६० रिजेक्टेड  २७  निष्कर्ष न निघालेले १८   अहवाल बाकी २७

 

 

(स्त्रोत: जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)