रक्तदान आणि शिलेदारांचा सन्मान
अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम 

 

 

लोणी व्यंकनाथ (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम  यांचे पुण्यतिथी निमित्ताने अग्नीपंख फौंडेशनने  रक्तदान शिबीर , वृक्षमित्र व एम पी एस सी चे शिखर सर करणाऱ्या शिलेदारांचा पोलिस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार महेंद्र माळी, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, वृक्षामित्र आबासाहेब मोरे यांचे हस्ते सन्मान श्रीगोंदा येथे नुकताच करण्यात आला आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन केले. 

              रक्तदान शिबीरात 41 जणांनी रक्तदान केले या सर्व रक्तदात्यांना केशर आंबा रोपटे भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी एम.पी.एस.सी. चे शिखर सर करणारे शिलेदार अजय शिंदे (उपजिल्हाधिकारी), प्रतिक्षा खेतमाळीस (पोलिस उपअधीक्षक), अजिंक्य सुर्यवंशी (उपमुख्य कार्यकारी अधिकारी), नरेंद्र शिंदे  (नायब तहसीलदार) तसेच वृक्ष चळवळीत उल्लेखनीय योगदान देणारे रामेश्वर विद्यालय चिखली हरित परिवार (चिंभळे), वसुंधरा बचाव अभियान( लोणी व्यंकनाथ), सुरज टकले (सुरेगाव), आत्माराम ससाणे सर (थिटे सांगवी) यांचा गौरव वृक्षामित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. यावेळी  डॉ.अरुण सचीन लगड, जयसिंग जवक, राजेंद्र खेडकर, रमजान हवालदार, शिवदास शिंदे, बी. बी. गोरे, शुभांगी लगड, अंजली बगाडे, अंकुश घाडगे, मधुकर काळाणे, गणेश डोईफोडे, शरद जमदाडे, बंन्टी उबाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप काटे यांनी केले. अग्नीपंख फौंडेशनने एम.पी.एस.सी. पास विद्यार्थी आणि वृक्षमित्रांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचा उपक्रम हाती घेतला यातुन इतरांना अधिकारी होण्यासाठी प्रेरणा मिळेल.