श्रीगोंदा (प्रतिनिधी) जिल्ह्याची सर्व प्रशासकीय कामकाज प्रमुख असणारे जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यातील गृह शाखा या मागील 3 ते 4 दिवसापासून कोमात गेल्या असल्याचे दिसून येत आहे.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास काढावा लागतो. या पास चे परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेतून दिली जाते.यापूर्वी ही परवानगी तत्पर किंवा 1 दिवसात दिली जात असे. परंतु मागील 3 ते 4 दिवसापासून ही परवानगी प्रोसेस बंद असल्याचे समजते. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत संपर्क साधला असता एकदा संपर्क झाला आणि त्यानंतर अद्याप पर्यंत 0241- 2343600 तसेच 2344001 हा क्रमांक बंद ठेवण्यात आला आहे. मुख्य जिल्हाधिकारी कार्यालयात फोन केला असता ते गृह शाखेच्याच क्रमांका वर संपर्क साधण्यास सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अडचणीच्या वेळेत संपर्क कुणाशी करायचा ? की नागरिकांनी पास काढायचाच नाही ? की जिल्हाधिकारी कार्यालय पण तोंड पाहून कामे करते ? की जिल्हाधिकारी ज्या दिवशी ऑफिस मध्ये नसतील तेव्हा मुद्दाम फोन बाजूला ठेवणे असे प्रकार जाणून बुजून मुद्दाम केले जात आहेत का ? याबाबत असे अनेक प्रश्न अनेक नागरिक उपस्थित करत आहेत. याबाबत जिल्हाधीकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद असल्याने तसेच निवासी जिल्हाधिकारी निचित यांच्याशी संपर्क साधला असता ते व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये असल्याने संपर्क होऊ शकला नाही.