श्रीगोंदा (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचा बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2020 चा उत्कृष्ट निकाल लागला. विज्ञान विभागाचा निकाल 98.72% , वाणिज्य विभागाचा 94.05% आणि कला विभागाचा 82.08% निकाल लागला. विज्ञान विभागामध्ये कु. झिंजाडे आकांक्षा दत्तात्रय या विद्यार्थिनीने 90.46% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला , महाडिक राधाकृष्ण शामराव या विद्यार्थ्यास 90.15% गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि कुमारी धालवडे ऋतुजा रंगनाथ या विद्यार्थिनीस 87.23% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. वाणिज्य विभागामध्ये कु. लवांडे स्वाती संजय या विद्यार्थिनीने 89.08% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला , औटी तेजस संजय या विद्यार्थ्यास 86.77% गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि जगताप श्रीनाथ सुरेश या विद्यार्थ्याने 86.40% गुण मिळवून तृतिय क्रमांक मिळवला . कला शाखेमध्ये कु.हरिहर सोनाली संजय या विद्यार्थिनीने 92.00%गुण मिळवून तीनही शाखांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला तसेच रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात सर्वप्रथम क्रमांक मिळवला आणि देवकाते शुभम बंकट या विद्यार्थ्याने 79.54% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. धायगुडे मिनाक्षी सावळेराम या विद्यार्थिनीने 78.62%गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. महाविद्यालयाने याही वर्षी उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मान. आमदार श्री बबनराव पाचपुते, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मान. बाबासाहेब भोस, मा. आ. राहुल दादा जगताप यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के साहेब त्याचबरोबर ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य श्री रत्नाकर झिटे, श्री. जाधव ए. बी. , श्री. शेटे बी. बी. , श्री. सासवडकर व्ही. एस. व महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.